प्रकाश(बाळासाहेब)आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथील वंचित बहुजन आघाडी तर्फे उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप..

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :-दि 11/5/2023 रोजी तालुका कर्जत वंचित बहुजन आघाडी तर्फे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय.प्रकाश उर्फ .बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपून साजरा करण्यात आलेल्या यावेळी प्रथम वंचित बहुजन आघाडीने सामाजिक बांधिलकी जपायची परंपरा या वर्षी सुद्धा कायम राखण्यात या आली कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये फळेवाटप करून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितीत *वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. ऍड. अरुण (आबा )जाधव मा. तालुकाध्यक्ष सोमनाथजी भैलुमे* प्रा. विक्रम कांबळे कैलास घोडके सर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ अवसरे पत्रकार देवा खरात अजिनाथ शिंदे बापू जाधव हे सर्व उपस्थित होते व सर्व कार्यकर्त्यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस उत्साह साजरा केला..