राशीन ग्रामपंचायत च्या वतीने विविध सुशोभीकरण कामाचा शुभारंभ.

राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी. :- १५ व्या वित्त आयोगांअतर्गत राशीन ग्रामपंचायतीच्या वतीने राजेंद्र भैय्या देशमुख व उपसरपंच शंकरराव देशमुख यांच्या खंबीर मार्गदर्शनाने राशीन मधील वार्ड क्रमांक १ रमाई नगर या ठिकाणी सुशोभीकरणासाठी सात लाख रुपये रस्त्याच्या पेव्हिंगब्लॉक कामाचा शुभारंभ सरपंच नीलम भीमराव साळवे यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव, अशोक जंजिरे ,नाजीम काझी, भीमराव साळवे रावसाहेब पंडित, गजानन माकोडे, सचिन लष्करे, पिंटूशेठ चलरेजा, संजय जाधव, दत्ता उजागरे, दादा विटकर, अजीम काझी, पिंटू शेठ राऊत, धनु शेलार, पवन देशमाने, अण्णा रगडे, ईश्वर माने, निळकंठ काळे, हारुण शेख, पोपट जाधव, इतर ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच वार्ड क्रमांक दोन मधील माऊली सायकल वस्ती येथे जिल्हा परिषद शाळेसमोर प्रारंगनाथ सुशोभीकरणासाठी २ लाख रुपये पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी कामाचे उद्घाटन तसेच माऊली सायकर वस्ती वर २.२५ लाख रुपये शौचालय बांधण्याचा भूमिपूजन कामाचा शुभारंभ सरपंच नीलम भीमराव साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य अमोल जाधव, अशोक जंजिरे, युवराज सिंह राजे भोसले, नाझीम काझी, भीमराव साळवे, माऊली सायकल ,पवन जांभळकर, बापू उकिरडे, महिला वर्ग व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.