तिरुपती पत्रा कंपनीचा भव्य शुभारंभ – 7 फेब्रुवारीला उद्घाटन सोहळा

कर्जत: येथील उद्योग क्षेत्रात एक नवे पर्व सुरू होत असून, तिरुपती पत्रा कंपनी या नव्या व्यवसायाचा 7 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वास्ता भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन यानिमित्ताने हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
हा उद्घाटन समारंभ जीओ पंप समोर,राशिन रोड, कर्जत, जि. अहमदनगर येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी 11:00 ते सायं 5:00 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नानासाहेब शिंदे यांनी केले आहे.
समस्त शिंदे परिवार कर्जत-जामखेड यांच्या वतीने या नव्या व्यवसायाचा शुभारंभ होणार आहे.
तिरुपती पत्रा कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना उच्च दर्जाच्या पत्र्याचा पुरवठा केला जाणार असून, या मंगल प्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नानासाहेब शिंदे परिवार आणि आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.