कर्जत येथील महावितरण कार्यालयाच्या ३३/११ के व्ही उपकेंद्राला आग.

कर्जत प्रतिनिधी: कर्जत तालुक्यासह शहराला वीज पुरवठा करणारे कर्जत येथील महावितरणच्या ३३/११ के व्ही उपकेंद्राला शॉर्टसर्किटने आग लागली सुरुवातीला आग विझविणसाठी त्या ठिकाणी उपस्थित असणारे अधिकारी व कर्मचारी उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय सांगळे,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता सतीश वानखेडे कर्मचारी इंग्लिश सुरवसे वैभव थोरात मनोज गीते प्रियंका रोडे दीपक म्हस्के वीज वितरण च्या ठेकेदारीचे काम करणारे विशाल जाधव या सर्वांनी लागलेली आग विझविण्यासाठी खूप प्रयत्न केले.
आग नियंत्रणा बाहेर गेल्यामुळे व विजत नसल्याने लगेचच कर्जत नगरपंचायत चे अग्निशामक दलाची गाडी बोलावून आग विझवण्यात आली महावितरण चे किरकोळ स्वरूपात नुकसान होत मोठा अनर्थ टळला आज कर्जत तालुक्यासह शहर अंधारात राहण्याची वेळ आली असती परंतु
सर्वांच्या प्रयत्नाने तसेच नगरपंचायत च्या अग्निशामक दल वेळेवर हजर झाल्या मुळे आगेवर नियंत्रण मिळवता आले. व होणारा मोठा अनर्थ टळला.