कर्जत-जामखेड मध्ये पुन्हा रोहित दादा पवार ; रोहित पवारांनी वाजवली विजयाची तुतारी

कर्जत (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल आज (23 नोव्हेंबर) जाहीर होत असून एकेका मतदारसंघाचा निकाल समोर येण्यासही सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत अनेक बिग फाईट्स पहायला मिळाल्या.
यातच कर्जत-जामखेड मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते कारण अहिल्यानगरच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात (कर्ज जामखेड विधानसभा) महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांचे घोषणा होताच हा मतदारसंघ राज्यभर चर्चिला गेला. कारण या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व युवा नेतृत्व रोहित पवार यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी काटे की टक्कर पाहायला मिळाली.