मनरेगा अंतर्गत आ प्रा राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कामा करिता भरघोस निधी उपलब्ध

कर्जत (प्रतिनिधी) :- आर्थिक वर्ष २०२३/२४ अंतर्गत मनरेगा अंतर्गत कुशल कामांकरिता असलेला वाव लक्षात घेऊन लोक प्रतिनिधींनी पत्रान्वये सुचविलेल्या कामा करिता शासनाने निधी खर्च करण्यास परवानगी दिलेली आहे .६०/४० या टक्केवारी साठी अहमदनगर जिल्हा हा निकष मानलेला आहे . यामध्ये कर्जत तालुक्यातील एकूण १७ कामाकरिता निधी रक्कम रुपये १६० लक्ष इतका निधी उपलब्ध झालेला आहे . मनरेगा अंतर्गत अकुशल/ कुशल चा ६०:४० या टक्केवारी नुसार खर्च करणेस परवानगी असते . अकुशल च्या खर्चित प्रमाणानुसार कुशलच्या कामाकरिता खर्चास वाव असतो . त्यानुसार प्रथमतः च कुशल चा निधी आ प्रा राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रभाणावर तालुक्यात उपलब्ध झालेला आहे . . यामुळे ग्रामीण भागातील गावअंतर्गत रस्ते, वस्ती रस्ते मुरमीकरण, खडीकरण अशी कामे मार्गी लागतील त्याचा दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे . तसेच सभामंडप सुशोभिकरण यासाठीही हा निधी उपलब्ध झालेला आहे .
हा निधी उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातून समाधान व्यक्त करणेत येत आहे . ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणारे गाव अंतर्गत रस्ते, शेत रस्ते मोठ्या प्रमाणावर मार्गी लागणार आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे मत भाजपा तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .