नियोजितऔद्योगिक वसाहत कर्जतमध्ये बैठक संपन्न, लोकांमधून जागेच्या सूचना मागविण्यात आल्या – आठ दिवसांत शासनाला प्रस्ताव दाखल होणार – आमदार प्रा राम शिंदे

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यासाठी नियोजित एमआयडीसी चा नव्याने जागेचा प्रस्ताव पाठविण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली.
यावेळी एमआयडीसी साठी सहा जागा सुचविण्यात आल्या. या जागेची त्वरित पाहणी करून एमआयडीसी साठी जमिनीचा प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा आशा सुचना आ. राम शिंदे यांनी केल्या.
बैठकीसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गवळी यांनी नियोजित जागेसाठीचे निकष याविषयी बैठकीत माहिती दिली . औद्योगिक वसाहतीसाठी जागा शक्यतो सपाट आणि समतल असावी, दळणवळणा साठी राष्ट्रीय मार्ग, राज्य मार्ग या लगत असावी . पडीक जमीन असावी, पाण्याची सोय, विजेची सोय असावी शक्यतो सलग क्षेत्र असावे . अशा प्रकारची शासकीय किंवा खाजगी जमीन असावी संबंधित जमिन धारकास शासन रेडीरेकनर दराच्या ४ पट मोबदला देते आणि संबंधित शेतजमीन मालकाला त्याच्या जमिनीच्या १०% विकसित भूखंड निःशुल्क दराने व्यवसायासाठी दिला जातो . अशा प्रकारची माहिती त्यांनी बैठकीस दिली .
आमदार प्रा राम शिंदे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले कि प्रस्तावित एमआयडीसी ला पाटेगाव येथील शेतकर्यांचा विरोध आणि ईडीच्या कारवाईमुळे देशातून परांगदा झालेला भगोडा निरव मोदी यांची असलेली वादग्रस्त जमिन, इको सेन्सिटीव्ह झोन संदर्भातील काही प्रश्न, वनविभागाचे नाहरकत,प्रस्तावित जमिनीची सलगता नसणे व अन्य काही त्रुटीमुळे तेथिल प्रस्ताव महाराष्ट्रऔद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांनी नाकारले आहेत त्यामुळे शासनाने तत्काळ नविन जागेचे नियोजित एमआयडीसी प्रस्ताव मागितलेले आहेत . शासनाने घोषणा करून दोन दिवस उलटले आहेत तरच आज शासकीय सुट्टि रविवार असतानाही अधिकारी या बैठकीस उपस्थित आहेत . बैठकीस उपस्थित तालुक्यातील सर्व लोकांना त्यांनी यासाठी जागा सुचविण्याचे आवाहन केले . अधिकारी यांनी सुचविलेले निकष पूर्ण करणारी जमिन सुचवा असे आवाहन त्यांनी केले. प्रथमच एमआयडीसी साठी जागा सुचविण्याने लोकांच्या मनात हवी आणि हव्या त्या ठिकाणी हि एमआयडीसी होऊ शकते त्यामुळे तरुण, तरुणींना रोजगार उपलब्ध होईल.
प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल . एमआयडीसी कर्जत तालुक्यात आणि फायदा जमिनी घेणाऱ्या दलालांचा असा सावळा गोंधळ नको . असे आवाहनही त्यांनी केले त्यामुळे लोकांनी सुचविलेल्या जागेचे सर्वेक्षण लवकरात लवकर म्हणजे आठ दिवसात पूर्ण करून घ्यावे जेणेकरुन पुढील प्रक्रियेस विलंब लागणार नाही . एकदा नियोजित एमआयडीसी जागा सर्व निकष पूर्ण करत निवडली तर त्या ठिकाणी दलालांना जमिनी घेण्यास मज्जाव करू तसेच आता या जागा प्रसिद्धी मुळे त्या ठिकाणचे शेतकरीही जागरूक होतील आणि दलालांना शेतकरी जमिनी विकणार नाहीत. रेडीरेकनर दराच्या ४पट मोबदला आणि निःशुल्क १०% विकसित भूखंड यामुळे जमिन धारकांनाही योग्य न्याय मिळेल कृपया जमिनी दलालांना विकू नका असे आवाहन त्यांनी केले .
उपस्थितांनी सहा ठिकाणे सुचविलेली आहेत. प्रामुख्याने कोंभळी, चिंचोली रमजान परिसर, थेरगाव राष्ट्रीय महामार्ग लगत, वालवड सुपे परिसर, अळसुंदा, कोर्टी परिसर, शेती महामंडळा शेजारी, परीटवाडी,देऊळवाडी, दगडी बारडगाव हा परिसर आणखी ही काही योग्प सूचना असल्यास कळवण्याचे आवाहन ही आमदार प्रा राम शिंदे यांनी केले .
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, काकासाहेब तापकीर,अशोक खेडकर,काका धांडे,
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब नेटके, युवक अध्यक्ष सोमनाथ शिंदे, शबनम शेख,प्रकाश शिंदे, सुनिल यादव, गणेश क्षीरसागर, गणेश पालवे,पप्पू धोदाड, अनिल गदादे, पप्पू धुमाळ,अँड राणे, नंदकिशोर नवले, राहुल निंबोरे, बंटी यादव या बैठकीचे नियोजन प्रांताधिकारी यांनी केले याप्रसंगी औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गवळी,
प्रांताधिकारी कर्जत,तहसिलदार कर्जत, तालुका कृषि अधिकारी कर्जत, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता कुकडी विभाग, वन्यजीव व प्रादेशिक वनविभाग अधिकारी, भूमि अभिलेख कर्जत अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .