मा.सरपंच झुंबर भिसे यांचे अपघाती निधन मलठणसह परिसरावर शोककळा

कर्जत (प्रतिनिधी) :- मलठणचे मा. सरपंच झुंबर भिसे यांचे अपघाती निधन झाले. नगर-सोलापूर महामार्गावर निमगाव डाकू जवळ रविवारी रविवार दि. 5 रोजी रात्री अंदाजे दहाच्या दरम्यान त्यांचा अपघात झाला असावा अशी चर्चा आहे. सोमवारी सकाळी रस्त्याच्या बाजूला त्यांची दुचाकी व मृतदेह आढळून आला. अपघात नेमका कसा घडला याबाबत माहिती समजू शकली नाही. मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह कर्जत येथे नेण्यात आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग भांडवलकर यांनी अपघात भेट दिली.
भिसे यांनी मलठणगावचे सरपंच म्हणून काम पाहिले. यांच्या कार्यकालात त्यांनी मलठण गावच्या विकासासाठी अनेक पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. सर्वसामान्यांशी झटणारा नेता अशी ओळख असणाऱ्या भिसे यांचा
तालुक्यातील प्रमुख राजकीय नेत्यांची व अधिकाऱ्यांशी चांगला संपर्क होता. मनमिळाऊ स्वभावाच्या झुंबर भिसे यांच्या अपघाती निधनाने मलठणसह परिसरावर शोककळा पसरली आहे.