ब्रेकिंग
कर्जत तालुक्यातील करपडी येथे अपघात अक्षय थोरात यांचा मृत्यू.

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील करपडी फाटा येथे शनिवारी रात्री MH 12 TV 6304 या गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे.
कर्जतच्या दिशेने दुचाकीवरून येताना चार चाकी MH 12 TV 6304 या वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये ओंकार थोरात वय २७ गंभीर जखमी असून केशर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे तर अक्षय थोरात, वय : २८, रा. भांडेवाडी, कर्जत याचा मृत्यू झाला आहे. अक्षयच्या अकाली निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.