यावर्षीच्या रथयात्रेवर राहणारा सीसीटीव्ही कॅमेरेसह ड्रोनची नजर

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत शहराचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यात्रेच्या अनुषंगाने परी पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील यांचे संकल्पनेतून कर्जत पोलीस स्टेशनच्या वतीने रथयात्रेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कायदा मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी रथयात्रेमध्ये होणाऱ्या चोऱ्यास प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण रथयात्रेवर तसेच रथ मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन कॅमेरे व्दारे नजर ठेवण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण यात्रेत तसेच रथ मार्गाच्या रस्त्यावर बसविण्यात येणार आहेत, ड्रोन कॅमेरा वापराबाबत परवानगी करिता कर्जत पोलीसांकडून पत्र व्यवहार करण्यात आला असुन लवकरच परवानगी प्राप्त होईल. रोटरी क्लब कर्जत सिटी चे वतीने ड्रोन कॅमेरे देण्यात येणार आहेत.
रथयात्रेकरिता पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
संत श्री गोदड महाराज रथयात्रोत्सवादरम्यान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर , हुल्लडबाजी करणाऱ्यावर, रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्यावर योग्य ती कडक कारवाई केली जाईल असे परि पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील यांनी सांगीतले आहे.