कर्जत शहरात कै. भास्करदादा तोरडमल व कै. दिलीपनाना तोरडमल क्रीडा संकुल यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य कुस्ती मदानचे आयोजन

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत शहरातील कै. भास्करदादा तोरडमल व कै. दिलीपनाना तोरडमल क्रीडा संकुल यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य कुस्ती मदानचे आयोजित करण्यात आले असून तालुक्यातील बहिरोबावाडी येथील कै. भास्करदादा तोरडमल आणि कै. दिलीपनाना तोरडमल यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य कुस्त्यांचे मैदान घेण्यात आले असल्याची माहिती क्रीडा संकुलाचे प्रमुख, राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष, जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष बहिरोबावाडीचे माजी सरपंच विजयकुमार तोरडमल यांनी दिली. २० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपासून कर्जतमधील क्रीडा संकुल येथे कै. भास्करदादा तोरडमल कै. दिलीपनाना तोरडमल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे कर्जत
तालुका केसरी व राजमुद्रा केसरी भव्य दिव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानाचे उद्घाटन कर्जत शहर आणि परिसरात गेल्या साडेतीन वर्षांहून जास्त अधिक दिवस सलग श्रमदान करणारे सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमींच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मैदानात नामवंत मल्ल हजेरी लावणार असून नेत्रदीपक व काळजाचा ठोका चुकवणाऱ्या कुस्त्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. २ उपमहाराष्ट्र केसरी व १० महाराष्ट्र चॅम्पियन कुस्त्यांमध्ये सहभागी होणार आहेत
तोरडमल कुटुंबावर आणि कै. भास्करदादा आणि कै. दिलीपनाना यांच्यावर प्रेम करणारे दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून दरवर्षी मैदान यशस्वी होत असते. यावर्षी कर्जत तालुका केसरी ही स्पर्धा घेतली जात असून या स्पर्धेमागे कर्जत तालुक्यातील मल्लांना मोठी संधी उपलब्ध व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा होत आहे. यात कर्जत तालुक्यातील ३२ मल्ल सहभागी होणार आहेत. मैदानात कुस्ती शौकिनांना बसण्यासाठी सुसज्ज अशी गॅलरीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वस्ताद ईश्वर तोरडमल, सचिन जाधव,धरमसिंह परदेशी,वैभव सुपेकर, किरण नलवडे, अशोक तोरडमल, अनिल तोरडमल, रमेश तोरडमल, डॉ. राजेश तोरडमल, महेंद्र तोरडमल, अमित तोरडमल तसेच क्रीडा संकुलातील मल्लही परिश्रम घेत आहेत.