खेड येथे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या कडून विद्यार्थिनींना ‘बांधिलकी नारी सन्मानाची’ या पुस्तिकीचे वितरण करण्यात आले.

कर्जत प्रतिनिधी : -कर्जत तालुक्यातील खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व डॉ जी. डी. सप्तर्षी ज्युनिअर कॉलेज येथे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आजपर्यंत राबविण्यात आलेल्या विविध विषयांवर बोलतानी सांगितले महिला व मुलींना निर्भय बनवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले. मुलींना पोलीस ठाण्याची सहल घडवली. ग्रामसुरक्षा दलाची उभारणी केली, भरोसा सेलसह समुपदेशनाचे उपक्रम घेतले. शाळा- महाविद्यालयात जाऊन जनजागृती केली. त्यामुळे महिला व विद्यार्थिनींमध्ये पोलिसांबाबत विश्वासाचे नाते निर्माण झाले. तालुक्यातून शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या. त्यावर काम करून महिला व मुलींना न्याय देण्याचे काम करता आले. त्यामुळेच या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थिनींना ‘बांधिलकी नारी सन्मानाची’ या पुस्तिकीचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत चेडे होते.
प्रास्ताविकात बोलताना प्रा. किरण जगताप म्हणाले, पोलीस निरीक्षक यादव यांनी कर्जत तालुक्यात राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे कर्जत पोलीस स्टेशनचे नाव वेगळ्या उंचीवर गेले. सामान्य जनता आणि पोलीस यातील अंतर कमी झाले. पोलीस स्टेशनकडून प्रकाशित झालेले ‘बांधीलकी नारी सन्मानाची’ ही पुस्तिका विद्यार्थिनींसाठी प्रेरक ठरणार आहे.
यावेळी पर्यवेक्षक गोरक्ष भापकर, कलाशिक्षक संदीप कदम, प्रा. सोमनाथ गोडसे, विजय सोनवणे तसेच अनुष्का मोरे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. प्राचार्य चेडे यांनी पोलिसांसमवेत आलेल्या सुखद अनुभवांचे कथन केले. यावेळी माजी उपसरपंच अमित मोरे, सोमनाथ वाघमारे, लक्ष्मण कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज लातूरकर, जब्बार सय्यद, पत्रकार विजय सोनवणे, प्रमोद शेळके, कर्जत तालुका प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रा. किशोर कांबळे, सहसचिव प्रा. सोमनाथ गोडसे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रा. किरण जगताप यांनी केले. पर्यवेक्षक गोरक्ष भापकर यांनी आभार मानले.