मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलची उत्तुंग भरारी

कर्जत : तालुका कर्जत ज़िल्हा अहिल्यानगर येथील न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी अद्विक अनिल शिंदे याने 150 पैकी 142 गुण मिळवून मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात पाचवा क्रमांक पटकावला तसेच इयत्ता पहिलीचा विद्यार्थी अद्वेत रमेश सुपेकर याने 150 पैकी 132 गुण मिळवून मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हास्तरावरील पाचवा क्रमांक पटकावून न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल शाळेची यशाची परंपरा कायम ठेवून यावर्षीही शाळेला यशाचा मान मिळवून दिला
त्यांच्या या यशाबद्दल श्री गोदडबा ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक व अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संभाजी लांगोरे साहेब ,समन्वयक किरणजी नाईक सर, प्राचार्य शिवाजी पाटील सर, पर्यवेक्षक राजेंद्रकुमार काळे सर यांच्या हस्ते दोन्हीही विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते.