कर्जत तालुका सकल मराठा समाज प्रमुख समन्वयक पदी रावसाहेब महादेव धांडे यांची सर्वानुमते निवड

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुका सकल मराठा समाज प्रमुख समन्वयक पदी शिवश्री रावसाहेब महादेव धांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यांच्या निवडीची सूचना मागील समन्वयक शिवश्री इंजि. विशाल मांडगे यांनी मांडली त्यावेळी विशाल मांडगे यांच्या सूचनेला उपस्थित सर्वांचीच अनूमोदक देत निवडीवर शिक्कामोर्तब केले बैठकीसाठी मराठा सेवक वैभव लाळगे,विजूकाका तोरडमल,आप्पा काळे, तेजस पाटील, राम तोरडमल, सोमनाथ यादव, विजू नेटके, राहुल गांगर्डे,राहुल नवले,
धीरज पडवळ,सागर मांडगे, नितीन तोरडमल,रमेश गांगर्डे, श्रीहरी जगताप,रानमाळ वकील, बंटी यादव,प्रसाद कानगुडे, स्वप्निल तोरडमल,दीपक मांडगे,नितीन शेलार आधी मराठा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नूतन निवड झालेले प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे यांचा उपस्थितांच्या वतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला त्यावेळी बोलताना रावसाहेब धांडे यांनी सांगितले की आगामी काळात समाजाच्या हिताची काम करत येणारी शिवजयंती मोठ्या उत्साहाने सर्वांना सोबत घेऊन साजरी केली जाईल तसेच सकल मराठा समाजाच्या विविध मागण्या व आंदोलनासाठी भरीव काम करण्यात येईल.यावेळी रानमाळ वकील साहेब यांनी उपस्थित आमचे आभार मानले