न्यू इंग्लिश स्कूल आखाेणी विद्यालयाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सत्कारमूर्तींचा सन्मान

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- शिव पार्वती विकास संस्थेचे, न्यु इंग्लिश स्कुल आखोणी विद्यालयाच्य वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या सत्कारमुर्ती चा यथायोग्य सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सत्कारमुर्ती श्री कांबळे डि एस( मा. केंद्र प्रमुख) ,श्री जावेद काझी( सलाम इंडिया राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित पत्रकार),सचिन चव्हाण(विद्यमान सरपंच), शफिक सय्यद(अध्यक्ष दरबार उद्योग समूह) या सर्वांचा सत्कार विद्यालयाचे वतीने करण्यात आला, या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रीमान राजकुमार व्ही.
आंधळकर, आखोणी गावचे मा. सरपंच श्री लक्ष्मण (तात्या) सूळ, आखोणी गावच्या सोसायटी चे चेरमन श्री राजेंद्र भांडवलकर, रयत शिक्षण संस्थे मधील मा. प्राचार्य श्री झगडे सर, रिपब्लिकन पार्टी चे पदाधिकारी रविंद्र दामोदरे, इत्यादी मान्यवर व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते, या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या स्कुल बस सेवेला हिरवा कंदिल दाखवण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री तुरकुंडे सर( मुख्याध्यापक) यांनी केले, सूत्र संचालन शेलार सर, आभार प्रदर्शन पारखे सर यांनी केले, यावेळी विद्यालयाचे कर्मचारी श्री निंबाळकर सर, श्री गावडे संदीप (आप्पा), श्री सय्यद असीम, व श्री काळे गणेश उपस्थित होते.
तसेच दरबार उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शफीभाई सय्यद यांनी सलाम इंडिया पुरस्कारराने सन्मानित झालेल्या पत्रकार जावेद काझी. यांचा फेटा बांधून सत्कार केला यावेळी आखाेनी चे सरपंच सचिन चव्हाण, उत्कृष्ट पणे फेटा बांधण्याची कला हस्तगत केलेले पिंटू आढाव, अरुण उकिरडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.