राशिन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- शिवजयंती उत्सव समिती राशीन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक २५.२.२३ रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत फटाकड्याची आतिषबाजी करत ढोल ताशा च्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती ,मिरवणुकीमध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची वीस फूट उंचीची आकर्षक विद्युत रोषणाईचे लाइटिंग इफेक्ट द्वारे दिसणारी शिवरायांची मूर्ती अतिशय सुंदर व मनमोहक दिसत होती,
या जयंती मिरवणुकीत हत्ती, उंट ,घोड्यांवर स्वार झालेले शिवप्रेमी जणू त्या काळची शिवरायांच्या सोबत असलेल्या मावळ्यांची आठवण करून देणारा होता. अनेक शिवभक्त शिवप्रेमी व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेश
द्वारासमोरून निघत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय घोष करीत मोठ्या उत्साहात व जल्लोषात निघाली महाराजांची मिरवणूक महात्मा ज्योतिबा फुले चौकात येतात राशीन मुस्लिम समाजाच्या वतीने भाईचारा एकाेपा व सामाजिक बांधिलकी जपत मिरवणुकीतील शिवप्रेमींना उपस्थित मान्यवरांना इतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात थंडगार शरबत चे मोफत वाटप जयंती दरम्यान करण्यात आले.
त्यावेळी खास करून आमदार प्राध्यापक राम शिंदे, कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस स्टॉप, टायगर ग्रुप चे जाधव व प्रमुख मान्यवरांनी शरबत पिण्याचा आस्वाद घेतला. प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत शाहू राजे भोसले, शाम भाऊ कानगुडे, नितीन धांडे या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकी दरम्यान महाराजांच्या प्रतिमेवर क्रेन द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली, अनेक शिवभक्त व शिवप्रेमीनी डीजे च्या नृत्यावर ठेकाधरीत शिवरायांच्या मिरवणुकीमध्ये आनंद उत्सव साजरा केला. शेवटी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात येतात पै. शाम कानगुडे व युवा नेतृत्व विक्रम राजे भोसले यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या संपूर्ण जयंती उत्सव दरम्यान चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे शिवजयंती उत्सव समिती राशीन यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. यानंतर जयंती कार्यक्रमाची सांगता झाली.