डॉ. संतोष भुजबळ यांना खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा गौरव पुरस्कार

कर्जत (प्रतिनिधी) :- दि. २३ जुलै २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, कराड येथे झालेल्या ‘खाशाबा जाधव’ राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ यांना मान अभिमान विकास फाउंडेशन व ऑलिम्पिक वीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती द्वारा २०२३ सालचा ‘खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा गौरव पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ यांचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर व महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर सेवक यांनी अभिनंदन केले.