भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी सोयब (काका)काझी यांची वर्णी.

राशिन(प्रतिनिधी) जावेद काझी. :- आज भारतीय जनता पार्टी राज्य कार्यालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी व अल्पसंख्याक मोर्चा प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्या कार्यकारिणी मंध्ये
राशिन ता कर्जत येथील माजी मंत्री आमदार प्रा रामजी शिंदे यांचे खंदे समर्थक भाजपा अल्पसंख्याक मोर्चा चे जिल्हाध्यक्ष सोयब रियाजोद्दीन काझी यांची आज भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली
निवडी नंतर माजी मंत्री आमदार प्रा रामजी शिंदे साहेब खासदार सुजय दादा विखे पाटील जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जेष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष शेखर खरमरे,पप्पुशेठ दोधाड यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्वच स्तरातून काझी यांचे अभिनंदन होत आहे