google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत तालुक्यात भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक; दोघे गंभीर जखमी, चालक पसार

अज्ञात चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक; चालक घटनास्थळावरून पसार

Samrudhakarjat
5 2 6 2 2 4

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील राशीनजवळ महामार्गावर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. एका फर्निचर दुकानासमोर हा अपघात घडला. अपघातानंतर चारचाकी चालक घटनास्थळावरून निघून गेल्याची तक्रार कर्जत पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

याबाबत करमाळा तालुक्यातील पोंदवडी येथील हनुमंत जोतीराम मोडके यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, हनुमंत मोडके आणि त्यांचे आतेभाऊ सचिन पोपट वाघमारे हे मालवाहू वाहनाचा डिझेल पाइप आणण्यासाठी बारामती येथे गेले होते. तेथून दुचाकीवरून परतत असताना राशीनजवळील महामार्गावर एका फर्निचर दुकानासमोर अज्ञात चारचाकी चालकाने भरधाव वेगात वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात मोडके आणि वाघमारे हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर संबंधित चारचाकी चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी कर्जत पोलिसांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार प्रवीण सुतार पुढील तपास करीत आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker