google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ‘मतदारांची सहल’!

कर्जतच्या राजकारणात मोठी खळबळ; ७५ पैकी ६० मतदार सहलीच्या तयारीत?

Samrudhakarjat
5 2 7 7 4 7

कर्जत (प्रतिनिधी) :- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीतील वर्चस्व टिकवण्यासाठी मतदारांना राज्याबाहेर सहलीसाठी नेण्यात आल्याची माहिती समोर आली असून, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या सहलीची माहिती दिली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कर्जतच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कर्जत तालुक्यातून या निवडणुकीसाठी एकूण ७५ मतदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी ४५ मतदार सहलीत प्रत्यक्ष सहभागी असून, आणखी १५ मतदार सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सहलीतील मतदारांची संभाव्य संख्या ६० पर्यंत पोहोचणार आहे. या घडामोडींमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतांचे गणित आणि राजकीय समीकरणे याबाबत उत्सुकता वाढली आहे.

गावोगावच्या मतदारांचा सहभाग

या सहलीत कर्जत तालुक्यातील विविध गावांतील मतदार सहभागी असल्याचे पोस्टमधील माहितीतून समोर आले आहे. भोसे, मांदळी, बेनवडी, अंबिजळगाव, नागलवाडी, सुपेकरवाडी, वडगाव तनपुरा, बाभुळगाव दुमाला, सिद्धटेक, निमगाव डाकू, मिरजगाव, डिकसळ, गुरव पिंपरी, कोपर्डी, चिंचोली रमजान, चापडगाव, बारडगाव दगडी आणि नांदगाव यांसह विविध गावांतील मतदारांचा यात समावेश आहे.

तसेच दुरगाव, थेरगाव, रवळगाव, पिंपळवाडी, चांदे खुर्द, खंडाळा गोयकरवाडा, कुळधरण, पाटेवाडी, रुईगव्हाण, दुधोडी, बेलगाव, कर्जत, भांबोरा, चिलवडी, तिखी रातंजन, चांदे बुद्रुक, सितपूर, करपडी, लोणी मसदपूर-जळकेवाडी आणि कोकणगाव येथील मतदारही सहलीत सहभागी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कोरेगाव, पाटेगाव, बारडगाव सुद्रिक, कुळधरण आणि खांडवी येथील मतदारांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या सहभागी मतदारांमध्ये स्थानिक राजकारणात महत्त्व असलेल्या व्यक्तींचाही समावेश असल्याने या सहलीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणाचे पारडे जड?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागातील राजकीय ताकद आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावाचीही कसोटी मानली जाते. अशा परिस्थितीत कर्जत तालुक्यातील मतदारांच्या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मतदारांना सहलीसाठी नेण्यामागील राजकीय रणनीती काय, अंतिम क्षणी कोणती समीकरणे बदलणार आणि मतदानाच्या वेळी कोणाच्या बाजूने किती मतदार उभे राहणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र, या घडामोडींचा निवडणुकीच्या निकालावर नेमका काय परिणाम होईल, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, मतदारांच्या या सहलीमुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker