सतत पाठपुरावा करून मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाचे प्रलंबित प्रश्न कामाच्या रूपाने मार्गी लावले ; नाझीम काझी.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- सन २०१९-ते २०२४ या राशिन ग्रामपंचायत कार्यकाळात वार्ड क्रमांक चार मधून सदस्य होण्याची संधी मिळाली.दिलेल्या संधीचे सोने करत सरपंच ,उपसरपंच, सर्वसदस्य आम्ही सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करून सतत पाठपुरावा केल्यामुळे विविध निधी उपलब्ध करीतअल्पसंख्यांक समाजाची अनेक प्रश्न सोडवण्याचा कामाच्या रूपाने मार्गी लावण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत सदस्य नाझीम काझी यांनी केला असल्याचे सांगितले.
१) ईदगाह मैदान भुयारी गटार.
२) उर्दू शाळा पेवर ब्लॉक.
३) शादी खाना.
४) मुंडे कब्रस्तान वॉल कंपाऊंड.
५) कब्रस्तान कंपाउंड साठी दहा लाखाचा निधी.
६)वाणी समाजाचे स्मशानभूमी वॉल कंपाऊंड.
आतापर्यंत एवढी कामे ग्रामपंचायत माध्यमातून आपणा सर्वांच्या आशीर्वादाने करू शकलो आहे. जनतेला विश्वासात घेऊन विश्वासाला तडा न जाता जनतेने जो विश्वास माझ्यावर दाखवला त्यास पात्र ठरत प्रामाणिकपणे प्रयत्न केला व सर्व कामे पूर्ण केली .हे सर्व कामे करत असताना बहुमोल मार्गदर्शन राजेंद्र देशमुख यांचे लाभले तर सहकार्य सरपंच नीलम साळवे, उपसरपंच शंकर देशमुख,ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले असल्याचे नाझीम काझी यांनी सांगितले.