राशीन येथे कर्जत तालुक्यातील मुस्लिम बांधवांचा इस्जेमा मोठ्या उत्साहात संपन्न.

राशिन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- शुक्रवार दिनांक ५/५/२३. रोजी दुपारी १२ ते रात्री ९.३० या वेळेत राशीन येथे कर्जत तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनसाठी इस्जेमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कर्जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थित झाले होते. या एक दिवसीय इस्तेमा मध्ये अल्लाह च्या मर्जीनुसार घालून दिलेल्या नियम ,अटी, शर्ती, बंधन,नमाज, कुरान, राेजे,तराबी, सदका,जकात, फित्रा, बाबत माहिती व मार्गदर्शन अनेक माैलाना कारी,आलीम ,हाफीज यांच्याकडून मुस्लिम समाजात बांधवांना यावेळी देण्यात आली. या एकदिवसीय इस्तेमासाठी जागा- कॉन्ट्रॅक्टर मतीन शेख मंडप व्यवस्था – खेड. वजुखान- मदिना मक्तब ट्रस्ट काझीनगर(परीटवाडी) जेवणाची व्यवस्था- कर्जत. स्वच्छता ग्रह- मिरजगाव. पाणी- ईदगाह मस्जिद. लाऊड स्पीकर, – जामा मस्जिद मरकज. राशिन
बिछायत- जोगेश्वरवाडी. पार्किंग और नाश्ता- कुरेशी मज्जिद राशीन.
सफाई- मोहम्मदिया मस्जिद.
पाणी सबिला_ दुरगाव मुसलमान बस्ती. अशा प्रकारे अनेक कर्जत तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून मुस्लिम समाज बांधवांकडून या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या स्वरूपाची मदत लाभली.
यावेळी मौलाना हाफिज शहानवाज कुरेशी, चांद साहब, मौलाना अब्दुल मतीन, मौलाना मुस्तफा भाई या सर्वांनी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले तसेच सामाजिक बांधिलकी व एकोपा जोपासण्याचे आव्हान करीत अमन, चैन, सुकून, सर्वांनसाठी दुवा करीत एकदिवसीय इस्तेमाची सांगता करण्यात आली यावेळी राशिन सह कर्जत तालुक्यातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.