पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशींनचा वीज वाहक तार तुटून करंट बसून जागीच मृत्यू

कर्जत(प्रतिनिधी) ऋषि पवार :- कर्जत शहरातील कुळधरण रोड लगत बरकडे वस्ती बर सोपान बरकडे हे म्हशी पालन व्यवसाय करून आपल्या दोन मुलांसहीत उदरनिर्वाह करतात. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमधून साल घालून त्यांनी छोट्या छोट्या रेड्या विकत घेतल्या. त्या रेड्यांचे संगोपन करून दूध व्यवसाय करत असताना दि ९ सप्टे रोजी दुपारी एक वाजता
अचानक कर्जत शहरा नजीकच्या समर्थ बंधाऱ्यामध्ये म्हशी पाणी पिण्यासाठी गेल्या असता वीज वाहक तार तुटून अगोदरच त्या बंधाऱ्यातील पाण्यामध्ये पडलेली होती.. त्या तारेमध्ये विजेचा चा प्रवाह (करंट) चालू असल्याने त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी
गेलेल्या चार ही म्हशींना विजेचा प्रवाह पाण्यामध्ये उतरल्याने त्या म्हशींनचा करंट बसून जागीच मृत्यू झाला.
कर्जत शहरा लगत च्या समर्थ बंधाऱ्यात विजेची तार पडल्याने येथील पाणी पिण्यास गेलेल्या चार म्हशीचा करून अंत झाला, मालकांच्या हे लक्षात आल्या नंतर त्याने इतर म्हशीना हुसकावून त्याचा बचाव केला.
त्यामधील तीन म्हशी सात ते आठ महिन्याच्या गाभण होत्या व एक म्हैस दोनच दिवसांपूर्वी व्यालेली होती. या अकस्मात दुर्घटनेने पशुपालक शेतकऱ्याचे सुमारे साडे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे
यामुळे त्यांच्या कुटुंबावर फार मोठे संकट ओढावले आहे. कर्ज काढून आम्ही म्हशी घेतल्या असून याची त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. महावितरण चे कर्मचारी याठिकाणी येऊन गेले असून पंचनामा केला असल्याचे समजते. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे संबंधित शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झालेली आहे. त्या शेतकऱ्यास योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी डॉ विलास नामदेव राऊत यांनी केली आहे.