google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
गुन्हेगारीब्रेकिंग

८ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा; अखेर दरोडेखोर जेरबंद!

राशीनमधून सागर भिताडेला अटक; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Samrudhakarjat
4 8 3 4 2 3

कर्जत | प्रतिनिधी :- गेल्या तब्बल आठ वर्षांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार राहून पोलिसांना सतत चकवा देणाऱ्या सराईत आरोपीला अखेर कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. सागर दत्तात्रय भिताडे (वय ३०, रा. भिताडेवस्ती, राशीन, ता. कर्जत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, २०१८ सालापासून तो पोलिसांच्या रडारवर होता.

कर्जत पोलीस ठाण्यात ७ फेब्रुवारी २०१८ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१/२०१८ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३९५ (दरोडा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर आरोपी सागर भिताडे हा फरार झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

दरम्यान, १२ जून २०२६ रोजी कर्जतचे पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फरार आरोपी सागर भिताडे हा राशीन येथील त्याच्या राहत्या घरी आला आहे. माहिती मिळताच विशेष तपास पथकाने तातडीने कारवाई करत भिताडेवस्ती परिसरात सापळा रचला.

पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता त्याने संबंधित दरोड्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अधिकृतपणे अटक केली.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड, सपोनि रमीझ मुलाणी, पोउपनि प्रदीप बोन्हाडे, ग्रेपोसई बाळासाहेब मुळीक तसेच पोलीस अंमलदार विशाल क्षिरसागर, किरण बोन्हाडे, प्रकाश दंडाडे, अमोल रायकर, नानासाहेब वाघमारे, आशा खामकर, आबासाहेब आवारे आणि मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी सहभाग घेतला.

तब्बल आठ वर्षांनंतर फरार आरोपीला गजाआड करण्यात यश आल्याने कर्जत पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker