google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
कृषीवार्ताब्रेकिंग

Rohit Pawar: रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर ठाम, तब्येतीबद्दल डॉक्टरांकडून अपडेट

Samrudhakarjat
4 8 3 0 6 2

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सकाळपासून सरसकट कर्जमाफी साठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. छत्रपती शिवाजी चौकात परवानगी नसतानाही आंदोलन करत सरकारला इशारा दिला. पण, रात्री उशिरापर्यंतही तोडगा निघाला नाही. त्यामुळे रोहित पवार हे स्टेजवर झोपले. कृषिमंत्र्यांनी फोनवर चर्चा केली, पण जोपर्यंत कुणी बोलायला येत नाही, तोपर्यंत आंदोलन सोडण्यात रोहित पवारांनी नकार दिला.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी  आमदार रोहित पवार यांनी सकाळपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. सायंकाळनंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधत संवाद सुरू ठेवला.तीन वेळा जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत रोहित पवार यांची चर्चा झाली. तर दोन वेळा कृषी मंत्री थेट फोन वर बोलले. मात्र जोपर्यंत थेट कर्जमाफीच्या जाचक अटी बाबत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत यावर तोडगा निघाला नाही.

मुख्यमंत्री फडणवीस करणार चर्चा

त्याआधी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडून आमदार रोहित पवारांशी कृषिमंत्री दत्तात्रय बरणे आणि सहकार मंत्र्यांशी चर्चा केली. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याने 2019 ची कर्जमाफीची अट मागे घेण्याबाबत आम्ही सकारात्मक असू, असं कृषिमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच कृषिमंत्री दत्ता भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंदोलनाबद्दल चर्चा करणार आहे. चर्चेनंतर कृषिमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडून  सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत बैठक लावण्यात येणार आहे. आमदार रोहित पवारांना आश्वासनं पुढील काही तासात आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत कृषिमंत्री आणि सहकार मंत्र्यांची चर्चा करणार आहे.

चर्चा नको, ठोस आश्वासन द्या’

“फक्त चर्चेसाठी निमंत्रण नको. महाराष्ट्रासमोर येऊन मंत्र्यांनी 2019 च्या अटीबाबत जाहीर आश्वासन शेतकऱ्यांना द्यावं.  मंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाहीर आश्वासन दिलं तरच आंदोलनाच्या पुढच्या निर्णयाचा विचार करू, अशी भूमिका आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केली. 

रोहित पवारांची तब्येत स्थिर

दरम्यान, आमदार रोहित पवारांच्या तब्येतीची रात्री डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.

सकाळपासून आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे. ब्लड प्रेशरसह इतर तपासण्या डॉक्टरांनी केल्या. आमदार रोहित पवारांची तब्येत सध्या तरी स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker