विश्वशांतीसाठी कर्जत मध्ये उत्तराध्यायन सूत्रांचे आयोजन संपन्न…


कर्जत (प्रतिनिधी):- भ. महाविरस्वामीची अंतिमवाणी म्हटले जाणाऱ्या श्रीमद् उत्तराध्यान सूत्र हे अत्यंत महत्वाचे असून याची नियमित साधना करण्यासाठी उपाध्यायप्रवर प. पू. श्री प्रविणऋषी जी म. यांच्या संकल्पनेतून राज्यात विविध शहरात सुरू झालेल्या महिलांच्या जिनेश्वरी ग्रुपच्या वतीने यावर्षी दीपावली निमित्त भाऊबीजेच्या सुप्रभाती उत्तराध्यान सूत्रांचे वाचन राज्यातील विविध ठिकाणी संपन्न होत असतांना यामध्ये कर्जत येथे ही जैन स्थानकासमोर हा कार्यक्रम पार पडला

कर्जत येथील जिनेश्वरी ग्रुपच्या वतीने गुरुवार दि २३/१०/२०२५ रोजी सकाळी ६:३० वा श्री जैन स्थानक, श्री गोदड महाराज मंदिरा समोर आयोजीत केलेल्या या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपली मनोगते नगराध्यक्ष रोहिणी घुले, माजी नगराध्यक्षा उषा राऊत, नामदेवराव राऊत, सुनील शेलार, छाया शेलार, हर्षदा काळदाते, यांचे सह जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अशोक कोठारी, माजी अध्यक्ष उदय बलदोटा, सुनंदा बोरा, यांनी
व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेजल बलदोटा, आभार वर्षा कोठारी यांनी मानले. यावेळी डॉ प्रकाश भंडारी, स्वप्नील देसाई, बीजेएसचे अध्यक्ष निलेश बोरा, संतोष भंडारी, किरण बोथरा, भूषण देसरडा, प्रवीण मुनोत,
यांचे सह अनेक जैन व जैनेत्तर स्त्री पुरुष नागरिक उपस्थित होते.




