युनियन बँकेच्या लेखी आश्वाशना नंतर राशीन शिवसेनेचे उपोषण मागे.

राशिन ( प्रतिनिधी )जावेद काझी. :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून युनियन बँक ऑफ शाखा राशीन यांना सर्वसामान्य नागरिकांच्या होणाऱ्या विविध मागण्या व अडचणी बाबत अमोरण उपोषण करण्या बाबत लेखी निवेदन दिले होते. तसेच निवेदनातील एक ते अकरा मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 3.10.23 रोजी युनियन बँकेच्या राशीन कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने आमरण उपोषण छेडण्याच्या इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता.
परंतु शाखा अधिकारी बापूसाहेब सुपेकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब नेटके, युवा सेना प्रमुख सोमनाथ शिंदे, राशीन शहराध्यक्ष दीपक जंजिरे, तालुका उपप्रमुख ऋषभ परदेशी यांच्यात झालेल्या बैठकीत निवेदनात दिलेल्या 1ते11 मागण्याविषयी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर व याविषयी लेखी स्वरूपात विविध मागण्या मान्य झाल्यामुळे दिनांक 26.10.2026. रोजीचे होणारे युनियन बँक ऑफ इंडिया शाखेसमोर होणारे आमोरण उपोषण मागे घेण्यात आले. अशी माहिती शिवसेनेचे राशीन शहराअध्यक्ष दीपक जंजिरे यांनी दिली.