राशीन मध्ये महावितरणच्या भोंगळ कारभारास संबंधित अधिकारी व कर्मचारीच जबाबदार ; नागरिक त्रस्त.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- संपूर्ण महाराष्ट्रात वरून राजाचे आगमन झाल्यामुळे गेल्या आठवड्या भरापासून पावसाने राशीन सह परिसरात चांगला जोर धरला असून नित्य नियमाने दररोज पावसाचे प्रमाण वाढत असून या नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार दर दिवशी विद्युत प्रवाह खंडित होत असून स्थानिक व्यावसायिक व इतर नागरिक त्रस्त झाले असून विद्युत प्रवाहावर आधारित असलेले
व्यवसायिक हतबल झाले असून या महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सध्या चाललेल्या डिसाळ व बेजबाबदार पणा मुळे कामचुकार पणामुळे राशिन व परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून विद्युत पुरवठा तक्रार संदर्भात सब स्टेशन राशीन मध्ये फोन केला असता वेळेवर फोन उचलत नाही, कदाचित तर उचलला तर वरूनच लाईट गेली आहे, केव्हा येईल सांगता येत नाही,
मेन लाईनचा फॉल्ट झालं आहे, विद्युत रोहित्र जळाले आहे किंवा नादुरुस्त झाले आहे.तारा तुटल्या आहेत, खांब पडले आहेत,काम चालू आहे, कामासाठी पैशाची मागणी करणे, अशा अनेक समस्यांच्या पाडा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यारी व कर्मचाऱ्यांकडून नेहमी ऐकावयास मिळतो. या सर्व डिसाळ व बेजबाबदार चुकार प्रक्रियेस
राशीन सब स्टेशन मधील संबंधित अधिकारी (ए .ई) देकाटे , टेकाडे, व इतर कर्मचारी वर्ग जबाबदार असून वरिष्ठ कार्यालयीन अधिकाऱ्यांनी चालवलेल्या ढिसाळ कामाची चाचपणी करून लक्ष घालून संबंधित बेजबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून राशिन व परिसरातील नागरिकांना वारंवार बंद होणाराविद्युत पुरवठा सुरळीत करण्यास योग्य ती पाऊले उचलावीत अशी मागणी राशीन व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.