pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

महिलांसाठी स्वच्छालय बंद; आठवडी बाजारात महिलांची कुचंबणा!

बाजारतळ परिसरातील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मागणी

Samrudhakarjat
4 7 7 7 0 7

कर्जत | प्रतिनिधी :- कर्जत शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील बाजारतळ परिसरात नगरपंचायतीचे सार्वजनिक स्वच्छालय अस्तित्वात असूनही ते महिलांसाठी उपलब्ध नसल्याने आठवडी बाजारात येणाऱ्या महिला नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप युवक शहराध्यक्ष नामदेव थोरात यांनी केला आहे.

गोदड महाराज गल्ली, गवंडे गल्ली, बाजारतळ आणि जुने कोर्ट परिसरात दर आठवड्याला मोठ्या प्रमाणावर बाजार भरतो. शहरासह ग्रामीण भागातील महिला खरेदीसाठी येथे मोठ्या संख्येने येतात. मात्र परिसरातील सार्वजनिक स्वच्छालय बंद अवस्थेत असल्याने महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे थोरात यांनी सांगितले.

महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने विशेषत ; बाजाराच्या दिवशी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक स्वच्छालयाची नियमित देखभाल, स्वच्छता आणि वापरासाठी खुले करण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

नामदेव थोरात यांनी सांगितले की, कर्जत शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून शहरात विविध भागांमध्ये नागरिकांची सतत वर्दळ असते. विशेषत ; आठवडी बाजाराच्या दिवशी शहरात हजारो नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे केवळ एका ठिकाणी नव्हे तर शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी महिलांसाठी व नागरिकांसाठी सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे गरजेचे आहे. शहरातील स्वच्छतेबरोबरच मूलभूत सुविधा म्हणून स्वच्छतागृहांची उपलब्धता असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशासनाने तातडीने लक्ष घालून बंद असलेले स्वच्छालय सुरू करावे तसेच शहरातील विविध भागांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

“कर्जत शहर मोठे होत आहे. स्वच्छतेबरोबरच शहरातील विविध ठिकाणी सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे ही काळाची गरज आहे. विशेषतः बाजाराच्या दिवशी महिलांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.” – नामदेव थोरात, युवक शहराध्यक्ष

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker