कर्जत जामखेडचे आमदार आम्ही ठरवू ; दिलीपराव कांनगुडे

कर्जत (प्रतिनिधी) :- पोरचेष्ठा चालवली असल्याने पुढचा आमदार कोण हे आम्ही ठरविणार असे स्वाभीमानी सकल मराठा बहुजन विचार मंचाचे समन्वयक इंजी दिलीप कानगुडे यांनी कर्जत येथील लकी हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
स्वाभीमानी सकल मराठा बहुजन विचार मंचाचे पदाधिकारी यांच्या सह दिलीप कानगुडे यांनी ही पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत बोलताना कानगुडे पुढे म्हणाले की,
मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष व अनेक पदांवर काम केले स्वयंभू स्थान निर्माण करावे या उद्देशाने व बाहेर फिरत असताना आलेल्या अनुभव यावर काम करण्यासाठी प्रेरणा घेऊन पुढील काळात तालुक्यासाठी काम करायचे आहे.
कुकडीचे पाणी आले पण पाणी मिळाले का हे कोणी बघत नाही गरजवंत ला पाणी
मिळाले नाही एसटी डेपो करणे अवघड आहे का पण राजकीय पोरचेष्ठा चालवली जाते तालुक्यात अधिकारी येण्याची शक्यता नाही पंचड दबावाखाली आहेत.
भावा भावात बापलेकात वाद वाढविले जातात याला हे दोन्ही आमदार जबाबदार आहेत. यांनी हजारो घरे फोडली आहेत. संभाजी ब्रिगेड व सेवा संघ वेगळ्या विचाराच्या दावणीला बांधली दोन्ही सांगतात की पुढचा आमदार मीच तिसरा आहे का नाही यासाठी संघटना तयार केली. प्रत्येक गावात ३५ कुटुबे जोडणार पुढचा आमदार आम्ही ठरविणार कोण आमदार होतो ते आम्ही पाहू तालुक्याचा स्वाभिमान पुन्हा मिळवू व्हॉटसअप वर नुसते राजकारण चालू आहे याने विकास होतो का असा सवाल उपस्थित करत कानगुडे पुढे म्हणाले की कृषी, आरोग्य, रोजगार, लाईट व पाणी या मुलभूत व पायाभूत सुविधा वर काम करून जनतेला न्याय देण्यासाठी स्वतंत्र दबाव गट निर्माण करून काम करू असे म्हणत जनतेत जावून काम उभे करण्यात येईल.
कानगुडे पुढे म्हणाले की, जनतेला न्याय देण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून निवडणूकीत ५० उमेदवार उभे करणार असून महिला व तरूणांचे संघटन वाढविण्यावर भर देणार आहेत. तालुक्यात ९८ पाणी योजना झाल्या पण जनतेला पाणी मिळाले का ४० योजना पूर्ण आहेत पण उदघाटना अभावी सुरू नाहीत ही शोकांतिका आहे याला जबाबदार कोण एवढेच नव्हे तर तालुक्यात २५ कोटी रुपयांची कामे चालू असून ही कामे बेकायदेशीर चालू असल्याचा आरोप करत कानगुडे म्हणाले की, या पुढे चुकीचे कामे यापुढे चालू देणार नाही असा इशारा ही यावेळी कानगुडे यांनी दिला.