डॉ.विलास राऊत यांच्या प्रयत्नाला यश आ.राम शिंदे, खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून राशीन प्रभाग क्रमांक दोन मध्ये रस्त्यासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर

राशीन/प्रतिनिधी जावेद काझी. :- राशीन प्रभाग क्रमांक दोन हा लोकसंख्येच्या दृष्टीने व क्षेत्रफळाच्या दृष्टीने राशीनमध्ये सर्वात मोठा प्रभाग असून या भागांमध्ये दळणवळणासाठी रस्त्यांची नितांत आवश्यकता आहे. या रस्त्यासाठी डॉ.विलास राऊत यांच्या मार्फत अनेक वर्षापासून पाठपुरावा चालू आहे. नुकतेच 4 फेब्रुवारी रोजी कर्जत येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदनाद्वारे सिद्धटेक रोड ते चौकीचा लिंब हा रस्ता व्हावा यासाठी मागणी करण्यात आली होती.
या मागणीला यश म्हणून या रस्त्याकरीता राज्यमार्ग 68 पासून ग्राम 124 याकरिता सुमारे तीस लाख रुपये निधी उपलब्ध झाल्याने रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. टप्प्याटप्याने पुढे हा रस्ता जाभळकर वस्ती पासून कलदेव राऊत वस्ती -अर्जुन राऊत वस्ती-मोढळे वस्ती- मोहिते वस्ती-राऊत-दानवले-तांबे वस्ती ते राज्य मार्ग ५४ चौकीचा लिंब राशीन भिगवण रोडला मिळवण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील सर्व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रभागातील रस्ते व्हावेत याकरिता डॉ. विलास राऊत यांनी अनेक वर्षेपासून स्व.खा. दिलीप गांधी, आमदार प्रा. राम शिंदे, खा. सुजय विखे पाटील, तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे, नगर चे पालकमंत्री तथा महसूल, पशुसंवर्धन दुग्ध विकासमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना लेखी पत्राद्वारे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता.
या रस्त्याच्या निधीसाठी भारतीय जनता पार्टी चे युवक नेते शहाजीराजे भोसले, भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष शेखर खरमरे यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच विक्रम राजेभोसले, दत्ता गोसावी ,पांडू भंडारे, एकनाथ धोंडे, तात्यासाहेब माने,शोयब काझी तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी यांच्या मार्गदर्शन, सहकार्यमुळे हे यश मिळाले असल्याचे डॉ.विलास राऊत यांनी सांगितले.