300 वर्षापूर्वीची पारंपारिक चिंचेच्या झाडाची जुनी खून राशीन इतिहासातून हद्दपार.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन गावच्या इतिहासातील तीनशे वर्षापासून जुनी ओळख निर्माण केलेल्या चिंचेच्या झाडाची पिढ्यापासून आलेली ओळख आहे . ती ओळख आज रोजी दौंड उस्मानाबाद राज्य मार्गाच्या रस्त्याच्या कामामुळे संपुष्टात आली असून जुन्या ओळखीला आज पूर्णविराम लागलेला दिसत आहे. मंगळवार बाजार असो किंवा इतर दिवशी पाहुणे मित्रमंडळी किंवा इतर कोणी बाहेर गावाहून आले गेले असता कोठे आहेस असे विचारले असता चिंचेच्या झाडाखाली थांबलो आहे किंवा थांबेल असे वाक्य अनेकांच्या तोंडातून आजही निघत आहे.
तेच चिंचेचे झाडाचा आज अंत झाला असून 300 वर्षापासून अनेकांना सावली देणारा वृक्ष आज आपल्यातून अलविदा झाला आहे हे नक्कीच. वर्षानुवर्षे माये प्रमाणे सावली देणारे हे चिंचेचे झाड खूप काही गोष्टी राशीनकरांना उपदेश देऊन गेले आहे. मरावे परी कीर्ती रुपे उरावे. याच चिंचेच्या झाडांची कत्तल होताना अनेक राशीनकरांनी हळहळ व्यक्त करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला.