अँप द्वारे इ पिक पहाणी मधील त्रुटी व अडथळे दूर करणे गरजेचे: अल्लाउद्दीन काझी.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- मोबाईल द्वारे इ पिक पहाणी करताना राज्यातील शेतकरी मेटाकुटीस आला असून सध्या राज्यात सर्वत्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या असून दुष्काळ ग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक अडचणींना सामोरे जाण्याची बिकट परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत ॲपद्वारे पाहणी अडचणीची ठरत आहे।
१) नेहमी सरोवर डाऊन असणे. २) वेळेवर मोबाईल रेंज नसणे. ३) शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसणे किंवा वापरण्याची माहिती नसणे.
इ पिक पाहणी अँपची माहिती नसणे. अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे अँपद्वारे पाहणी न करता शेतकरी सांगेल त्याप्रमाणे तलाठ्यांनी पिक नोंदी कराव्यात नाहीतर समक्ष पाहणी संदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश अध्यादेश काढावेत या संदर्भात समक्ष जिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदन देऊन भेटणार असल्याची माहिती भाजपा राज्य सरचिटणीस अल्लाउद्दीन काझी यांनी दिली आहे.