राशिन मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक चिखलमय.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी .जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पाणी साचलेल्या चिखलमय खड्ड्यातून नागरिकांना पायवाट काढावी लागत असून खास करून याच रस्त्याने जगदंबा देवी दर्शनासाठी जाणाऱ्या महिला,पुरुषांना, व इतर भाविक भक्तांना चिखल तुडवीत जगदंबा देवी दर्शनासाठी जावे लागत असल्यामुळे अनेक नागरिकांकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
मागील काही महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जगदंबा देवी मंदिर चौकापर्यंत आमदार सत्यजित तांबे साहेब यांच्या प्रयत्नातून पेवर ब्लॉक शुशोभीकरणासाठी दहा लाखाचा निधी मंजूर होऊन वर्ग झाला असून अद्याप काम का झाले नाही. कोणाचा विरोध आहे का? काम सुदृढ होण्यासाठी प्रशासक व काही नागरिक दौंड धाराशिव रस्त्याची ड्रेनेज लाईन होण्याची वाट पाहत आहेत का?
किंवा या कामासाठी स्थानिक प्रशासनाचा गलथानपणा होऊ शकतो का? असे अनेक प्रश्न राशिन व परिसरातील नागरिकांच्या मनात उद्भवत आहेत. या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते देवी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे सुशोभीकरण काम लवकरात लवकर करावे. अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी यांना राशीन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.