कर्जत तालुका खादी ग्राम उद्योग संघाची निवडणूक बिनविरोध.

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी :- कर्जत तालुका विविध कार्यकारी सहकारी खादी ग्राम उद्योग संघाची निवडणूक नऊ जागा बिनविरोध निवडून आल्या असून दोन जागेसाठी निवडणूक होऊन देखील दोन्ही जागेवर विजय मिळवत एकूण 11 जागेवर निर्वाद बहुमत प्राप्त झाले असून या मिळालेल्या यशाचे मार्गदर्शक कर्जतचे नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून झाली ,भटक्या विमुक्त आघाडी संचालक पदी सौ. राधा संतोष माने यांची बिनविरोध तर सर्वसाधारण जागेसाठी बिनविरोध निवड राम किसन साळवे,माणिक पवार प्रभाकर विठ्ठल, साळवे रामचंद्र कोंडीराम,सुरवसे महादेव रामभाऊ, उदमले हरिदास हबाजी ,भैलुमे अंकुश रामदास तर अनुसूचित जाती जमाती मधून बिनविरोध कदम रोहन किसन तसेच महिला राखीव दोन जागेसाठी निवडणूक झाली
त्यातून विजयी उमेदवार डमरे छाया मोहन व बोराटे वैशाली कैलास आणि इतर मागासवर्गीय जागेतून बिनविरोध निवड खंदारे महादेव शिवराम अशा एकूण 11 जागेवर बहुमताने विजय प्राप्त झाल्याबद्दल तात्या माने यांनी नामदेव राऊत यांचा फेटा बांधून सत्कार केला व आभार व्यक्त करीत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत सत्कार करीत पेढे भरवीत आनंद उत्सव साजरा केला.