महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमीत्ताने भास्कर भैलुमे मिञ मंडळाच्या वतिने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.

कर्जत (प्रतिनिधी) :- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने मंगळवार दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 3 वाजे पर्यंत भास्कर भैलुमे मिञ मंडळ कर्जत तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद मराठी मुलाची शाळा कर्जत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .असून जास्त नागरिकाणी रक्तदान करावे असे आवाहन भास्कर भैलुमे मिञ मंडळाचे प्रसिध्दी प्रमुख निलेश भैलुमे यांनी केले आहे.
उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण दरवर्षीच कमी असते. त्यामुळे साहजिकच उन्हाळ्यात रक्त पिशव्यांचा तुटवडा भासतो असून जिल्हातील रुग्णालयासारख्या ठिकाणी रुग्णांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. आता सुद्धा जिल्हातील सर्व रुग्णालयात रक्तपेढीत अत्यल्प साठा आहे. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकाला समाधानी करण्याचा येथील कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असतो. परंतु. अद्याप तरी रक्ताला रक्तदानाशिवाय कोणताही अन्य पर्याय नसल्याने रुग्णांचे नातेवाईक अश्या प्रसंगी हतबल असतात. त्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती च्या निमित्ताने या रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कर्जत तालुक्यातील सर्व शाहु फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता नी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन भास्कर भैलुमे मिञ मंडळाच्या वतिने करण्यात आले आहे.