pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशिन ग्रामपंचायतीने चिखलमय रस्त्यांबाबत ग्रामस्थांचा सहनशीलतेचा अंत पाहु नये :- शाहू राजे भोसले.

Samrudhakarjat
4 6 9 5 4 1

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :-  राशीन व परिसरात सौम्य स्वरूपाचा पाऊस नुकताच सुरू झाला असून तुरळक भुरभुर स्वरूपाच्या पावसाने राशिन मुख्य बाजारपेठ, वेशीपासून जुना कुंभारगाव रस्ता राजे शॉपिंग सेंटर पर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कैकाडी गल्ली, इतर रस्त्ये पावसाच्या पाण्याने चिखलमय झालेले असून या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर वाहतुकीत तसेच शालेय विद्यार्थ्यांना व इतर नागरिकांना जीव धोक्यात घालून चिखलय रस्त्यातून रोज वाट काढावी लागत आहे.

जागोजागी झालेल्या चिखलमय खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना खडतर प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा सांगून देखील ग्रामपंचायत मार्फत याबाबत कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले जात नाही किंबहुना तात्पुती मुरमाची मलमपट्टी होते परंतु नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती बघावयास मिळते या अनुषंगाने ग्रामपंचायत तात्काळ पाऊले उचलीत सिमेंट काँक्रीट, पेव्हर ब्लॉक टाकून रस्त्याचे काम मजबूत करावे . तसेच राशीन ग्रामपंचायतने चिखलमय खराब रस्त्या बाबत ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.

तात्काळ ग्रामविकास अधिकारी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी चिखलमय खराब रस्त्याची पाहणी करून कामाला लागावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा झहरी इशारा राशीन चे माजी सरपंच शाहू राजे राजे भोसले यांनी राशिन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker