ब्रेकिंग
राशीन येथील नौशाद काझी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

Samrudhakarjat
4
0
1
4
1
4
राशीन ( प्रतिनिधी):- जावेद काझी.राशिन तालुका कर्जत येथील जामा मस्जिद (मरकज) चे विश्वस्त नौशाद मुनिरोदिन काझी यांचे आज सायंकाळी ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. आपले संपूर्ण आयुष्य इस्लाम धर्म प्रसार करण्यात व्यस्त असणारे नौशाद काझी हे संपूर्ण नगर जिल्ह्यात आपली सामाजिक धार्मिक कार्यात ओळख निर्माण केली होती. यांच्या जाण्याने मुस्लिम समाजात मोठी सामाजिक बांधिलकी जपणारी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या अचानक जाण्याने राशीन व परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुस्लिम धर्मातच नव्हे तर हिंदू व इतर धर्मात देखील नौशाद यांच्या दुःख झाल्याचे पहावयास मिळत आहे. नौशाद काझी यांचा अंत्यविधी आज मंगळवार दिनांक १०.९.२०२४.रात्री ११ अंत्यविधी जामा मस्जिद मरकज कब्रस्तान येथे होणार आहे नौशाद काझी यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले होत.