राशीन मधील अवैद्य धंदे आठ दिवसात बंद न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार:- रवींद्र दामोदर.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशिन हे गाव कर्जत तालुक्यातील व्यापार पेठ , बाजार, दैनंदिन होणारी आर्थिक उलाढाल या दृष्टीने मोठी मानली जाते. यामुळे राशीन येथे हातभट्टी दारू, मटका, झुगार व इतर बेकायदेशीर अवैद्य धंदे राशिन पोलीस दूर क्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक व इतर पोलीस कर्मचारी यांच्या आशीर्वादाने गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून जोमात चालू आहे. तसेच राशीन आठवडे बाजार दर मंगळवारी भरतो, महाराष्ट्र राज्य कानाकोपऱ्यातून बाजार साठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात बघावयास मिळते बैल बाजार व भाजीपाला इतर बाजार मोठा भरत असल्यामुळे आर्थिक उलाढालही ही मोठी होत असते याचाच फायदा घेत भर बाजारात दिवसाढवळ्या लाल काळं व इतर वैद्य बेकायदेशीर धंद्यामुळे अनेक तरुण युवकांचे प्रपंच उद्ध्वस्त होतात व झाले असून दारू पिल्यामुळे 20 ते 30 वयोगटातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील आतापर्यंत ७२ तरुण मुलांना आपला जीव व्यसनापाई गमवावा लागला आहे. तसेच दोन-तीन तरुणांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. सदरचा बेकायदेशीर हातभट्टी दारूचा व्यवसाय, मटका, जुगार, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे किंवा मिली भगत हप्ते गोळा करीत, चालूच राहिला तर भविष्यात आणखी कितीतरी तरुण वर्ग व इतरांचे संसार उध्वस्त होऊन रस्त्यावर येतील. तरी या सर्व नमूद केलेल्या बाबी तात्काळ दखल घेऊन राशीन येथील बेकायदेशीर अवैद्य धंदे तात्काळ बंद करण्यात येऊन संबंधित हातभट्टी दारू विक्री करणारे लाल काळं चालविणाऱ्या खऱ्या व मूल मालकांवर( पंटरवर किंवा कामावर असणाऱ्या तरुणांवर कायदेशीर काय कारवाई न करता) योग्य ती कायदेशीर कारवाई मूळ मालकांवर करावी. सदरची कारवाई आठ दिवसात न झाल्यास आरपीआयचे रवींद्र दामोदर पोलीस अधीक्षक अहमदनगर कार्यालयासमोर आत्मदहन करण्याच्या इशारा निवेदन द्वारे दिला आहे. या संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग, व कर्जत पोलीस स्टेशन यांना रवींद्र दामोदरे यांनी निवेदन सादर केले आहे. तसेच यापुढे घडलेल्या व उद्धवलेल्या परिस्थितीला पोलीस प्रशासनच जबाबदार राहील असे देखील रवींद्र दामोदरे यांनी निवेदनात म्हटले आहे. या सर्व बाबींवर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते की मांजरी सारखी भूमिका घेते बघणे महत्त्वाचे असेल.