ब्रेकिंग
राशीन महामार्गावर भीषण अपघात 1 ठार 1 जखमी

Samrudhakarjat
4
0
1
3
2
4
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत- राशीन महामार्गावर शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. टाटा टेम्पोची टीव्हीएस कंपनीच्या दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सिद्धेश्वर गोरख गदादे, वयः ३८, रा. बेनवडी, ता. कर्जत असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर रणवीर राहुल गुंड,
वय : १०, रा. कर्जत असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असल्याची माहिती मेहराज पठाण यांनी दिली. पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. कर्जत नजीकच्या पाण्याच्या टाकीजवळ हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झालेले आहे. टेम्पो हा कर्जतच्या दिशेने येत होता तर दुचाकी बेनवडीच्या दिशेने जात होती.