सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे दादा पाटील महाविद्यालयात आयोजन

कर्जत (प्रतिनिधी) :- महाविद्यालयीन युवकांमध्ये संशोधनाची वृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते. मंगळवार दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे विभागीय अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनजेमेंट, विधी आदि शाखेचे जवळपास ५०० संशोधक विद्यार्थी सहभागी होणार आहेत
विभागीय अविष्कार संशोधन स्पर्धेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे IQAC Director व Director IIL & Member Secretary प्रा. डॉ. संजय ढोले हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर असणार आहेत.
दादा पाटील महाविद्यालयाचे
IQAC समन्वयक डॉ. संदीप पै, शैक्षणिक आणि संशोधन समन्वयक डॉ. महेश भदाणे हे संयोजक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. दादा पाटील महाविद्यालयाला A ++ मानांकन मिळाल्याने विद्यापीठाने सदर स्पर्धेचे आयोजकत्व महाविद्यालयाला दिले असल्याचे मत प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी व्यक्त केले आहे