श्री संत नरहरी महाराज यांच्या पायी दिंडीचे स्वागत कर्जत नगरीत मोठ्या उत्साहात

समृध्द कर्जत (प्रतिनिधी) :- श्री संत नरहरी सोनार महाराज यांची श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडी काल दिनांक ०६/०७/२०२४ रोजी कर्जत मध्ये या दिंडीच्या आगमन झाले यावेळी फटाक्याच्या आतिषबाजी करत भाविकांनी स्वागत केले वारकऱ्यांचे स्वागतासाठी सडा रांगोळी काढण्यात आल्या होत्या रात्री हरिभक्त परायण गोरख महाराज यांचे किर्तन संत नरहरी सोनार मंदिर कर्जत येथे मोठ्या उत्साहात झाले
थोर संत शिरोमणी नरहरी महाराज पायी दिंडी सोहळा २०२४ या दिंडी ची परंपरा २४ वर्षा पासून सुरू आहे तसेच या दिंडीचे महाराष्ट्रात कुठे ही समाधी नाही याचे मूळ गाव श्री क्षेत्र पढरपूर आहे...
श्री संत गोदड महाराजांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे श्री क्षेत्र नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूर पालखीचे आगमन अतिशय धार्मिक वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले त्यावेळेस वारकऱ्यांना कर्जत नगरीतील प्रभाग क्रमांक आठ मधील समर्थ नगर परिसरा मधील श्री अमृत शहाणे सर यांनी वारकऱ्यांसाठी अल्पोपाराचे वाटप करण्यात आले त्यावेळेस प्रभागाचे नगरसेवक पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल, प्रभागातील नागरिकांच्या वतीने स्वागत केले. त्याचबरोबर प्रभागातील श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आमदार रोहित पवार यांच्या वतीने श्री संत नरहरी महाराज पायी दिंडीचे स्वागत करून दिंडीतील वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण होण्यासाठी पान कागद घोंगड्याचे वाटप शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, युवक शहराध्यक्ष नामदेव थोरात, सोशल मीडिया अध्यक्ष दीपक यादव तसेच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पायी दिंडी सोहळा त्या दिंडीचे विद्यमान अध्यक्ष श्री सचिन सुरेशकाका कुलथे, उपाध्यक्ष श्री देवरामदादा शहाणे, खजिनदार श्री रवींद्र बोराडे, कार्याध्यक्ष श्री किशोर बोराडे, ह भ प कल्याण महाराज डहाळे, श्री कृष्णकांत शहाणे, हभप श्री रमेश महाराज फापाळे यांचा सत्कार अमृत मुरलीधर शहाणे सर व प्रभागाचे नगरसेवक पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल ,परहर सर,दत्तात्रय काळे, यांच्यासह प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला…