खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वतीने राशीन येथे डाळ साखरेचे मोफत वाटप होणार.

राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी :- अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घराघरात गोड पदार्थ करून सन साजरा करण्याचा आनंद सर्वसामान्य नागरिकांना व इतरांना दुगुणीत करता यावा या हेतूने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने भक्त निवास जगदंबा देवी मंदिर राशीन येथे गुरुवार दिनांक
१८/१/२०२४. रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत मा. आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते प्रत्येक रेशन कार्ड धारक कुटुंबाला चार किलो साखर व एक किलो डाळ मोफत वाटण्यात येणार आहे. यासाठी येताना सोबत आपले रेशन कार्ड व त्याची झेरॉक्स प्रत घेऊन येणे बंधनकारक आहे. तरी राशीन नगरीतील सर्व रेशन कार्ड लाभधारक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.