कर्जत येथे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज जन्मस्थळ मंदिर ते पैठण या दिंडीचा सांगता सोहळा व मुस्लिम समाजाच्या इफ्तार पार्टी चे ऐकत्र आयोजन

कर्जत (प्रतिनिधी):- हिंदू मुस्लिम ऐकतेचे प्रतीक घडवत कर्जत येथे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज जन्मस्थळ मंदिर ते पैठण या दिंडीचा सांगता सोहळा व मुस्लिम समाजाच्या इफ्तार पार्टी चे ऐकत्र आयोजन करत पै प्रवीण घुले यांनी समाजापुढे आदर्श ठेवला असल्याचे कौतुकोद्गार माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी काढले.
कर्जत येथून पैठण वारीसाठी दरवर्षी नाथषष्ठी निमित्त ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज जन्मस्थळ मंदिर ते पैठण या दिंडीचे आयोजन केले जाते. यावर्षी या दिंडीचे पैठण मध्ये विशेष कौतुक झाले. संत एकनाथ महाराज यांच्या ४२५ व्या नाथषष्ठी सोहळ्या निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो दिंड्या तसेच कर्नाटक राज्यातील काही दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्या होत्या यावर्षी कर्जतची ही दिंडी पैठण यात्रेची आकर्षण ठरली. या सोहळ्यानंतर काल दि ८ एप्रिल रोजी दिंडीचा सांगता सोहळा पार पडला यावेळी या दिंडीत सहभागी झालेल्या सर्व भाविकांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करन्यात आले. या कार्यक्रमात संत श्री. सदगुरु गोदड महाराज दिंडीचे चालक प्रविण घुले यांनी बोलताना पैठण येथील दिंडीच्या सोहळ्याचे वर्णन विशद करून ही महाराजांची कृपा असल्याचे म्हंटले श्री संत सद्गुरु गोदड महाराज पायी दिंडी सोहळ्यात कर्जत ते पैठण पर्यंत सर्व जाती धर्माचे लोक या दिंडीत सहभागी झाले होते. यामुळे या भूमीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य भाईचारा अबाधित असून भविष्यात ही तो असाच अबाधित राहील. श्री संत सद्गुरू महाराज यांचा कोणताही उत्सव असो सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या भक्ती भावाने यात सहभागी होतात.असे माजी जि. प. सदस्य प्रवीण घुले पा. म्हणाले.
यावेळी हभप दत्तात्रय शिंदे, नबिलाल शेख आदिसह अनेकांची भाषणे झाली. यावेळी माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी या दिंडी सोहळ्याचे कौतुक करत कर्जत येथील श्री संत सदगुरु गोदड महाराज यांच्या भूमीत हिंदू मुस्लिम ऐक्य भाईचारा अबाधित असून कोणताही सोहळा सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन उत्साहात साजरा करतात हे या भूमीचे वैशिष्ट्य आहे असे म्हटले. यावेळी अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, सचिन घुले, गोरखे महाराज, मुळे महाराज, महेश तनपुरे, तानाजी पाटील, पिंटू अण्णा पाटील, रज्जाक झारेकरी, मिरताज बेग, नबीलाल शेख, राजू बागवान, अनिल गदादे, ओंकार तोटे, कासम पठाण, आयुब काझी आदी सह अनेकजण उपस्थित होते. यावेळी पैठण दिंडी सोहळ्यातील भाविक आणि रमजान निमित्त इफतार करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण घुले पा. मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यानीं मोठे परिश्रम घेतले.