लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नातून जगदंबा विद्यालय राशीन च्या विद्यार्थ्यांना मोफत ५७० सायकलचे वाटप.
कर्जत जामखेड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नातून श्री जगदंबा विद्यालय राशीन येथील

कर्जत (प्रतिनिधी) :- इयत्ता पाचवी ते आठवी तीन किलोमीटर अंतरावरील गरजू गरीब विद्यार्थ्यांना आज सकाळी नऊ वाजता विद्यालयाच्या आवारात पै. शामभाऊ कानगुडे, स्कूल कमिटी सदस्य शाहू राजे राजे भोसले, राशिन चे उपसरपंच शंकर देशमुख स्कूल कमिटी सदस्य रामकिसन साळवे, विकास मोढळे समृद्ध कर्जत चे पत्रकार जावेद काझी व इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त झालेला दिसत होता, त्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना हलाकीच्या परिस्थितीतून मात करीत शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी रोज विद्यालयात येण्या जाण्यासाठी वेळ वाया जाऊ नये शाळेत येण्याचा त्रास कमी व्हावा ह्या हेतूने माननीय आमदार रोहित पवार यांनी ह्या मुलां मुलींना सायकल स्वरूपात मोलाची मदत दिली.
हे ते नन्हे बालक आपल्या पुढील भावी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. हे नक्कीच यावेळी जगदंबा विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडागळे सर, पर्यवेक्षक राजेंद्र साळवे सर, ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे ,नाजीमभाई काझी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष माऊली सायकर, इमरान शेख, संदीप साळवे, शिक्षिका देशमाने मॅडम, इतर शिक्षक स्टॉप व लाभार्थी गरीब गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.