ब्रेकिंग
राशिन मध्ये श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी.

Samrudhakarjat
4
0
1
9
1
2
राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- छत्रपती शिवाजी महाराज चौक राशीन येथे श्रीराम सेना आयोजित सार्वजनिक श्री राम नवमी सोहळा फटाकड्याची आतिषबाजी करीत जय श्रीराम च्या घोषणा देत मोठ्या उत्साहात व जल्लोसात साजरा करण्यात आला सर्वप्रथम श्री रामा च्या प्रतिमेचे पूजन चिमुकल्या अन्वी भागवत हिचे हस्ते करण्यात आले
यावेळी श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर श्रीराम प्रतिमेची मिरवणूक रथामध्ये काढण्यात आली. खास आकर्षक म्हणजे नाशिक येथील सरगम बँडने श्री रामा वर आधारित गीत गात उपस्थित सर्वांचे मने जिंकली यानंतर मिरवणूक महात्मा फुले चौकातून पुढे राम मंदिर येथे गेल्यानंतर येथे राम जन्मोत्सव साजरा करीत कार्यक्रमाची सांगता झाली.