राशिन मध्ये स्मशानभूमी समोर लालपरी बस थांबा स्थानक बनवण्यास निवेदनाद्वारे तीव्र विरोध.

राशीन( प्रतिनिधी):- जावेद काझी. राशीन येथे दौंड धाराशिव राज्य मार्गावर राशिन – सिद्धटेक रोडलगत वीज मंडळा लगत घडशी, नाथपंथी डवरी, नाथपंथी गोसावी, रजपूत अशा ह्या चार समाजाची मिळून सामाजिक स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमी समोर रस्त्यालगत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे प्रवाशांना थांबण्यासाठी बस थांबा स्थानक बांधण्यात येणार आहे.
त्या बस थांबा स्थानकामुळे स्मशानभूमीकडे येण्या जाण्यासाठी रस्त्याची अडचण निर्माण होणार आहे .तसेच एखादी व्यक्ती मयत झाल्यास दफन दहन विधीसाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्मशानभूमी समोर लालपरीचा बस थांबा स्थानक बनवू नये अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर चारही समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचा रास्ता रोको करून आमरण उपोषण करण्यात येईल . याबाबतचे लेखी निवेदन समाजाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत, प्रांताधिकारी, तहसीलदार साहेब कर्जत, पोलीस निरीक्षक कर्जत,
ग्रामविकास अधिकारी,/प्रशासक ग्रामपंचायत कार्यालय राशीन यांना देण्यात आलेले आहे. यावेळी समाजाच्या वतीने शिवसेना तालुका उपप्रमुख वृषभ परदेशी, कमलेश साळवे, सामाजिक कार्यकर्ते अंबादास जाधव, अमर साळवे, युवा उद्योजक अमोल काळे, निखिल पानसरे, संदीप पानसरे, विकी साडी, पप्पू भाऊ, राजू साळी, आदी संबंधित समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.