ब्रेकिंग
अल्लाउद्दीन काझी यांना महात्मा गांधी मानव सेवा पुरस्काराने गोवा येथे सन्मानित.

Samrudhakarjat
4
0
1
3
9
0
राशीन ( प्रतिनिधी):- जावेद काझी.हशु अडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तसेच राशीन शहरचे मा. सरपंच ज्येष्ठ भाजपा नेते विकासपुरुष म्हणुन ओळख असलेले कर्जत तालुक्याची मुलुख मैदानी तोफ लोकप्रिय नेते माननीय अल्लाउद्दीन काझी साहेब यांना ज्ञानरचना सोशल फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने त्यांनी आजतागायत केलेल्या समाज कार्याचा गौरव म्हणुन “महात्मा गांधी मानव सेवा – ‘नॅशनल अवॉर्ड’ 2024” हा मानाचा पुरस्कार पणजी गोवा या ठिकाणी
आज 2 Oct 2024 महात्मा गांधी जयंती या शुभ दिनी गोवा विधानसभा अध्यक्ष मा.सभापती रमेशजी तवडकर साहेब यांच्या शुभहस्ते व मा.श्रीमती ममता ताई सिंधुताई सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काझी यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले त्याबद्दल राशीन व परिसरातून अल्लाउद्दीन काझी यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.