राशिन ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक शिंदे शिवसेनेचे दीपक जंजिरे लढवणार.

राशीन (प्रतिनिधी)जावेदकाझी. :- राशिन ग्रामपंचायत सरपंच पदासाठी (सर्वसाधारण) ओपन जागा आरक्षित झाली असून काही महिन्यातच राशीन ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख घोषित होण्याची चाहुल लागत असल्यामुळे शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, व कर्जत तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे राशीन शहर प्रमुख दीपक जंजिरे सरपंच पदाची निवडणूक लढवणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे. यासाठी दीपक जंजिरे यांनी मतदारसंघातील कार्यकर्ते मतदार यांच्याशी गाठीभेटी सुरू केल्या असून विकास कामे करण्याचा अजंठा घेऊन जंजिरे सरपंच पदाची निवडणूक लढवणार आहे.
तसेच राशीन ग्रामपंचायत सरपंच पदासाठी राजकीय प्रतिष्ठा असलेले मातब्बर राजकीय खिलाडी राजेंद्र भैय्या देशमुख,शाहूराजे भोसले, अल्लाउद्दीन काझी, मालोजी राजे भिताडे, दीपक जंजिरे यांच्या नावाची चर्चा राशिन च्या राजकीय वर्तुळात होत असून मतदारांच्या गाठीभेटीना वेग आला आहे.
तसेच येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी देशमुख -राजे- काझी असे तीन पॅनल होण्याची शक्यता वर्तवली जात असून तीनही पार्टीच्या रात्रीच्या राजकीय गुपित घोंगडी बैठका सुरू झाल्या असून तिन्हीही गटाचे प्रमुख स्वतंत्र पॅनल करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.