श्री जगदंबा देवी क्षेत्र, राशीन – नवरात्र उत्सवाची भव्य सुरुवात.


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी): श्री जगदंबा देवी क्षेत्र, राशीनमध्ये सोमवारी धार्मिक विधी आणि भक्तिपूर्ण वातावरणात नवरात्र उत्सवाला भव्य सुरुवात झाली. यंदाची पूजा व घटस्थापना प्रतिष्ठित शेटे परिवाराच्या हस्ते व पुजारी गणेश रेणुकर यांच्या मंत्रोच्चारात संपन्न झाल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. ग्रामजोशी संदीप देवा सागडे यांनी मंत्रोच्चार केले.या सोहळ्यास सरपंच शिवदास शेटे, शरदचंद्र शेटे, महेश शेटे, अमोल शेटे, उमेश शेटे, धनु पखाले, एडवोकेट युवराजसिंह राजेभोसले, सुनील रेणुकर, विश्वास क्षीरसागर, विकास वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ, शेटे

परिवारातील सेवेकरी, परिसरातील भाविक – भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवरात्र उत्सवात दररोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, विशेष आरत्या, देवीची सवाद्य पालखी, महिलांसाठी सामूहिक पूजा, व फराळाचे वाटप होणार आहे. मंदिर व परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळला आहे. भक्तांसाठी मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनाने आरोग्य, वाहतूक व आपत्कालीन व्यवस्थेसह सर्व सुविधा पुरवल्या असून, उत्सवाचा उत्साह आणि भक्तिभाव उंचावला आहे





